माजलगाव (प्रतिनिधी)
कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचा दिवसाढवळ्या बळी जात असताना,त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट, प्रस्थापित आणि घराणेशाही जपणाऱ्या राजकीय पक्षापासून सावध होणे गरजेचे आहे,राज्यात शेतकरी हवालदिल झालेला असताना,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या आणि शेतकऱ्याची शेती अंबानी आदाणीच्या घशात घालू पाहणाऱ्या भांडवलदार धार्जिन्ये सरकार आणि घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवून शेतकऱ्यांच्या व्यथा विधानसभेत मांडण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील,शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास बळ द्यावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी माळी पारगाव येथे दि.२३आक्टोंबर रोजी प्रचार दौऱ्यात बोलताना केले.या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई मुंजा पांचाळ,भाई राधाकृष्ण पांचाळ,निलाराम टोळे,श्रीराम कोरडे यांनी घराणेशाही,महागाई,वाढत्या भ्रष्टाचारा बदल चिंता व्यक्त केली ,यावेळी शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती होती.