बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सहा हजार जात प्रमाणपत्र प्रलंबित असताना गेल्या दोन महिन्यापासून जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शेकापचे नेते भाई ऍड नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला, नेत्यांच्या शिफारसीनुसार जात प्रमाणपत्र वाटप होत असून सर्वसामान्य नागरिक कार्यालयाचे उंबरवटे झिजवत असताना प्रशासनाकडून जात प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी नमूद केले.