बीड:- बीड शहरातील संत सावता माळी चौक परिसरात आज सकाळी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील संत सावता माळी चौक परिसरात संत सावता महाराजांचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच शहरातील सय्यद मजहर सय्यद अत्तार (वय-४०, रा. मोहम्मदिया कॉलनी, बीड), या इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सदरील हत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नसून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.पुढील तपास बीड पोलीस करत आहेत.