बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे . यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघासाठी बजरंग सोनवणे यांना दुसर्यादा उमेदवारी तर भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आधी पाच नावांची घोषण करण्यात आली होती. आता आणखी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली.