फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार नगर शहरात समोर आलेला असून मी पोलीस ऑफिसर बोलत आहे . आरोपीकडे तुमच्या दुकानाची पावती सापडली आहे असे सांगत नगरमधील एका व्यापाऱ्याला 32 हजार रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. दोन तारखेला शनिवारी हा प्रकार घडलेला असून कोतवाली पोलिसात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अमीनुद्दीन खान ( पूर्ण नाव माहित नाहीत ) व इतर एक व्यक्ती या दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून फिर्यादी व्यक्ती यांचे रंगार गल्ली येथे सराफा दुकान आहे.
शनिवारी संध्याकाळी त्यांना फोन आला त्यावेळी आपण उज्जैन महाकाल येथील एका पोलीस स्टेशनमधून पोलीस ऑफिसर बोलत आहे असे सांगत आरोपीने तुमच्या दुकानात चोरीचा माल देऊन दुसरा दागिना घेतला. त्याची पाच ग्रॅमची रिकव्हरी तुमच्याकडे आहे असे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी भीती दाखवत आरोपीने पैसे पाठवण्यास सांगितले होते . त्याच्या या धमकीला फिर्यादी व्यक्ती बळी पडले आणि त्यानंतर 32 हजार रुपयांची त्यांची फसवणूक झाली.