गेवराई, दि. २३ (प्रतिनिधी) गेवराई येथील र. भ. अट्टल कनिष्ठ महाविद्यालयाची ११ वी विज्ञान वर्गाची विद्यार्थिनी कु. मयुरी संजय वाळेकर हिने
जागतिक जल दिनानिमित्त जल जीवन मिशन, जिल्हा परिषद, बीडच्या वतीने बलभीम महाविद्यालय, बीड येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांकासह रोख ५५०० रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य मेजर डॉ. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र राऊत, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत पुरी, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, अधिक्षक भागवत गवंडी, प्रा. विवेक खानझोडे, प्रा. दत्तात्रय आवचार, प्रा. गणेश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल मयुरी वाळेकर हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.