नगदनारायण महाराजांच्या जयघोषाने गेवराईनगरी दुमदुमली ; हजारोंच्या उपस्थितीत कीर्तन सोहळ्याची सांगता
गेवराई:
संताचे उपदेश लक्षात घेऊन, आयुष्यात योग्य निती मूल्य सांभाळून वाटचाल करावी. साधुच्या आशीर्वादाने जीवन धन्य होते. संत भक्तांच्या जीवनामध्ये बदल घडवून त्यांच्या हातून सेवा घडावी आणि भक्तांचे कल्याण व्हावं हा हेतू अंतकरणांमध्ये ठेवून भक्तीरुपी राजमार्ग दाखवतात.जगाच्या कल्याणासाठी साधू – संत या भूतालावर जन्म घेवून भक्तीचा उपदेश करत असतात. स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा नगदनारायण महाराज हे थोर महान तपस्वी संत होवून गेले. जो भक्त नगदनारायण महाराजांची भक्तीभावाने मनोभावे सेवा करतो त्याला नगद फळ मिळते असे प्रतिपादन महंत शिवाजी महाराज यांनी व्यक्त केले.
गेवराई शहरातील संत गजानन महाराज मंदिरात स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा वै.ह.भ.प. नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित १३ व्या भव्य किर्तन सोहळयाची शनिवारी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. यावेळी नगदनारायण महाराजांच्या जयघोषाने गेवराई नगरी दुमदुमून गेली होती. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, युवा नेते रणवीर पंडित, युवा नेते शिवराज पवार, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, बप्पासाहेब मोटे, शहाणे गुरुजी, उत्तमनाना मोटे, नारायणराव मोटे,अक्रुर महाराज साखरे, कृष्णा महाराज राऊत, तुळशीराम महाराज आतकरे, हरि महाराज गवते, बळीराम महाराज यादव, संदिपान दातखिळ, हनुमान ठाकूर, ज्ञानेश्वर औटे, भागवत सकार्डे, अनिकेत महाराज, जेष्ठ पत्रकार शिवाजीमामा ढाकणे, मधुकर तौर, सुभाष सुतार, विनोद नरसाळे, अमोल वैद्य, विनोद पौळ यांच्या सह संत- महंत, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकार तसेच वारकरी संप्रदायातील जेष्ठ मान्यवर मंडळी, कीर्तन सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी तसेच महिला व पुरुष भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिवाजी महाराज म्हणाले की, साधू संतांनी गडरुपी टॉवर निर्माण केलेले आहेत ते आपल्याला भक्तीरुपी रेंज देतात. साधूंची सेवा केल्याने जीवनात काहीच कमी पडत नाही.साधूंचा आशिवार्दने कृपा होते. माझ्या सेवेमुळे माझे नगदनारायण महाराजांच्या यादीत नाव आले आहे. जीवनात तप असावे. भगवान आणि साधूचा आशिवार्द भेटला म्हणजे जीवन तृप्त होते. तसेच महिला वर्गाचे परमार्थात शुध्द आचारण आहे. जिजाऊंचे संस्कार प्रत्येक घराघरात पाहिजेत म्हणजे शिवाजी महाराज घडतील. तसेच संघटनेत विजय आहे. जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी लढा उभा केल्याने आज मराठा समाजाला न्याय मिळत आहे. तसेच तरुणांनो आत्महत्या करु नका, आत्महत्या सारखे दुसरे पातक नाही.आपल्या वाट्याला आलेले कर्म पुर्ण करा असा मौलिक सल्लाही शेवटी बोलताना दिला.तसेच सप्ताह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल महाराजांनी तोंड भरुन कौतुक केले.
दरम्यान सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक ॲड.परशुराम येवले,शिनुभाऊ बेदरे,गणेश नलावडे, गणेश पानखडे,उद्धव ढोक, साईनाथ सुरवसे, राम पवार, ॲड. सुभाष निकम, बाबासाहेब कुटे, मदनराव बेदरे, नंदु दहिवाळ, सुधाकर माळवे, सतिष दाभाडे, डॉ.मुरलीधर मोटे, डॉ.भगवान जाधव, डॉ.अशोक काळे, ज्ञानेश्वर ढोक, श्रीराम आरगडे, रामकिसन भोसले, सखाराम शिंदे, भाऊसाहेब गोंजारे, श्रीराम पवार, सुदाम पवार, रामजी धोंडरे, गणेश मोटे, रावसाहेब बेदरे, महेश बेदरे यांच्या सह आदींनी परिश्रम घेतले. कीर्तनानंतर हरिओम पंडित, बाळासाहेब बहीर, राधेशाम निकम यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मयुरध्वज ओटे यांनी उत्कृष्ट संचलन केले.