गेवराई (सा.वा) गोरगरिबाचे लेकर शिकले परंतु ते शिकून देखील नोकऱ्या मिळत नसल्यामुळे या तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे त्यांना ऑन द स्पॉट नोकि-या देण्याचे काम महेश अण्णा दाभाडे यांनी हाती घेतले असून हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत व या महोत्सवातून बेरोजगारी कमी होणार आहे आपण सरकारवर अवलंबून न राहता गावागावात महेश अण्णा दाभाडे सारखे अनेक अण्णा तयार होऊन बेरोजगारी हटविण्यासाठी प्रयत्न करावेत असे परखड विचार मनोज जरांगे पाटील यांनी नोकरी महोत्सवात मांडले.
महेश अण्णा दाभाडे मित्र मंडळाच्या वतीने गेवराई येथे दिनांक 10 मार्च रोजी बेद्रे लॉन्स येथे प्रथमच नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात हजारो बेरोजगार तरुणांनी उपस्थिती होती आणि या बेरोजगारांना 70 कंपन्यांच्या माध्यमातून ऑन दिस स्पॉट नोकि-या देखील मिळाल्या आहेत .या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महेश अण्णा दाभाडे यांनी नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत हा उपक्रम गावागावात झाले तर बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल त्यासाठी गावागावात महेश अण्णा दाभाडे सारखे अण्णा तयार व्हावेत जेणेकरून बेरोजगार तरुणाचा प्रश्न मार्गी लागतील असे मत यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी महेश दाभाडे मित्रमंडळाच्या वतीने अनेक बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत तर गेवराई तालुक्यात प्रथमच नोकरी महोत्सव घेण्यात आल्याने महेश दाभाडे मित्रमंडळाच्या कौतुक होत आहे. यावेळी महेश दाभाडे यांनी देखील हा महोत्सव एक दिवसाचा नसून या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही कायमस्वरूपी बेरोजगारीचे प्रश्न कायम सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही देखील महेश दाभाडे यांनी या महोत्सवानिमित्त दिली या महोत्सवाचे बहारदार सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले