गेवराई (वार्ताहर) १० मार्च रोजी महेश दाभाडे मित्र मंडळाच्या वतीने गेवराईत मोफत नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुंबई पुणे अहमदनगर छत्रपती संभाजी नगर नाशिक येथील नामांकित ५० कंपन्यातील पाच हजार रिक्त जागांसाठी या नोकरी महोत्सवात लाभ मिळणार आहे. तरी मोठ्या संख्येने या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन महेश दाभाडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे हे सातत्याने जनतेच्या न्याय हक्कासाठी विविध माध्यमातून अविरतपणे कार्य करत आहेत. त्यातच आता सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने महेश दाभाडे मित्रमंडळाच्या वतीने गेवराई मोफत नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेवराई शहरातील बेद्रे लॉन्स या ठिकाणी रविवार दि.१० मार्च रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत हा नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.मुंबई, पुणे ,अहमदनगर छत्रपती संभाजी नगर ,नाशिक येथील नामांकित ५० कंपन्यातील पाच हजार रिक्त जागांसाठी या नोकरी महोत्सवात लाभ मिळणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता १० वी व १२ वी – सर्व पदवीधर, आय टी आय- डिप्लोमा, इंजीनियरिंग ॲग्रीकल्चर, एम.बी.ए नर्सिंग असणार आहे. अधिक माहितीसाठी ९८६०४२१२०१,९५६१३३१२०१ या क्रमांकावर संपर्क साधावा व मोठ्या संख्येने या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन महेश दाभाडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.